सोने-चांदी आयातीस १५ बँकांना परवानगी (२०२६)

केंद्र सरकारने मार्च २०२९ पर्यंत सोने आणि चांदी आयात करण्यासाठी देशातील १५ बँकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. 'परकीय व्यापार महासंचालनालयाने' (DGFT) यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे
कालावधीया बँकांना १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही परवानगी देण्यात आली आहे.
प्रमुख बँकाया यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC) आणि बँक ऑफ इंडिया यांसह एकूण १५ सरकारी आणि खाजगी बँकांचा समावेश आहे.
विशिष्ट अटीयुनियन बँक आणि रशियाची स्बेरबँक (Sberbank) यांना मात्र केवळ सोन्याची आयात करण्याची मुभा देण्यात आली आहे.
विलंबाचा फटकाआयात परवानगीच्या आदेशाला विलंब झाल्यामुळे सुमारे ५ टन सोने आणि ८ टन चांदी सीमाशुल्क (Customs) मंजुरीविना अडकून पडली होती.
महत्त्व

साधारणपणे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हा आदेश दिला जातो. या अधिकृत परवानगीमुळे बँकांना आता कायदेशीररित्या सोने आणि चांदीची आयात करून देशांतर्गत मागणी पूर्ण करता येईल.